जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? राज ठाकरेंची खास पोस्ट
मुंबई : महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट लिहीली आहे. जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? असतील ही किंवा नसतील ही. पण आज देखील त्यांचं अनुकरण करावं असं जगातील लाखो करोडो लोकांना वाटतं, असे राज ठाकरेंनी म्हंटले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, आज महात्मा गांधीजींची जयंती. व्यक्तिगत ते सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेसाठीचा आग्रह, स्वच्छ, निर्मळ मन आणि अर्थात स्वच्छ हेतू ह्याच्या सहाय्याने त्यांनी हिंदुस्थानाला स्वातंत्र्याची दिशा नाही दाखवली तर जगाला अनेक शतकं प्रेरणा दिली. जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? असतील ही किंवा नसतील ही. पण आज देखील त्यांचं अनुकरण करावं असं जगातील लाखो करोडो लोकांना वाटतं, इतकं संचित मागे ठेवून गेलेल्या ह्या महापुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, आज लाल बहाद्दूर शास्त्रींची जयंती. गांधीजींसारखाच अंतर्बाह्य साधा माणूस. पण हे साधेपण हीच त्यांची शक्ती होती. ह्याच शक्तीच्या जोरावर, पंतप्रधानपदाच्या अल्प कारकिर्दीत सुद्धा असामान्य कामगिरी करून दाखवणाऱ्या लाल बहाद्दूर शास्त्रीजींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असेही राज ठाकरेंनी म्हंटले आहे.