राज यांच्या तीन सभा, वाचा प्रत्येक सभेत काय म्हणाले...
गुढीपाडव्याच्या दिवशी झालेले मनसेचा पाडवा मेळावा झाला. या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray)यांचे भाषण त्यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चांगलेच चर्चेत आले. मशिदीवरील भोंग्यांचा विषय राज्यानंतर देशात जाऊन पोहचले. आता औरंगाबादमधील सभा फक्त इशारा सभाच राहिली. आता नाही तर कधीच नाही, ४ मे नंतर भोंगे उतरले नाही तर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावा, असा आदेश मनसे सैनिकांना देत देशवासियांनाही विनंती केली आहे.
औरंगाबाद - १ मे
पहिल्या दोन सभांपेक्षा औरंगाबादमधील सभेत राज (Raj Thackeray)अधिक आक्रमक झाले. सुरुवातीला शरद पवार यांना दाखले देत जातीय राजकारण राज्यात त्यांनीच आणल्याचा आरोप राज यांनी केला. त्यानंतर हनुमान चालीसाच्या मुद्यावर राज ठाकरे अधिक आक्रमक झाले. ३ तारखेनंतर ऐकणार नाहीच, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
आतापर्यंत सहन केलं. मात्र आता 3 तारखेनंतर सहन करणार नाही. 'अभी नही तो कभी नही' असं म्हणत राज ठारकरेंनी आवाहन केलं की, जर मशिदीवरील भोंगे काढले नाही, तर डबल आवाजात त्यासमोर आम्ही हनुमान चालिसा वाजवू. विनंती करुन समजत नसेल तर आमच्यासमोर पर्याय नाही असंही राज ठाकरे म्हणाले.
बाबासाहेब पुरंदरेंना शरद पवारांनी उतरत्या वयात त्रास दिला. फक्त ते ब्राम्हण आहेत म्हणून. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राज्यात जातीवाद सुरु झाला. जातीबद्दल आपुलकी प्रत्येकाला होती, मात्र दुसऱ्या जातीबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला.
शरद पवार प्रत्येक माणसाकडे जातीमधून पाहतात. हातात पुस्तक घेतलं की लेखकाची जात पाहतात. राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तक वाचली का म्हणे...माझ्या आजोबांनी लिहीलेल्या सर्व गोष्टी तुम्ही वाचा मग कळेल असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी काही संदर्भ देखील दिले आहेत. राष्ट्रवादीमुळे दुसऱ्या जातीबद्दल भेद निर्माण झाला असा घणाघात राज ठाकरेंनी केले.
शरद पवार हे कधीही कुठल्या जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत नव्हते. आता मी बोलल्यानंतर त्यांनी छत्रपतींचं नाव घेण्यास सुरुवात केलीय. इतकंच नाही तर शरद पवार हे नास्तिक असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी हा आरोप केलाय. तसंच खुद्द शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत शरद पवार हे नास्तिक असल्याचं म्हटलं होतं,
उत्तर सभा - १२ एप्रिल- ठाणे
शरद पवार कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत ते भाषण करताना नेहमी तेव्हा शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव काहीच मानत नाहीत.
१२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी राज्य सरकारने चर्चा करावी आणि त्यांना सगळे भोंगे खाली उतरवण्यास सांगावे.
तीन तारखेनंतर देशभर जिथे जिथे भोंगे लागलेले असतील तिथे तिथे हनुमान चालिसा लागलीच पाहिजे. आम्हाला जो त्रास होतोय तो त्यांना झाला पाहिजे.
मी भोंग्याचं राजकारण करत नाही. महिलांना रस्त्याने जाताना सुरक्षित वाटलं पाहिजे. वयस्कर लोकांना, लहान मुलांना, अभ्यास करणाऱ्यांना त्रास होता कामा नये. यासाठी केसेस अंगावर घ्यायच्या झाल्या तर मी घेईन.
ज्या मुस्लिमांना प्रार्थना करायच्या आहेत. त्यांनी घरात कराव्यात. धर्म रस्त्यावर आणू नयेत. सणाच्या काळात समजू शकतो. पण 365 दिवस हे चालणार नाही.
आता हनुमान चालीसा सांगितलाय. माझ्या भात्यातला पुढचा बाण मी काढलेला नाही. तो काढायला लाऊ नका.
छगन भुजबळ यांना संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे जेलमध्ये जावे लागले. दोन अडीच वर्षे जेलमध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेते भुजबळ होते.
अजित पवारांच्या घरी रेड पडली, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. अजित पवारांच्या सख्ख्या बहिणींच्या घरी रेड होते. एकाच घरात राहून रेड टाळणं सुप्रिया सुळेंना कंस जमलं?
गुढीपाडवा मेळावा- २ एप्रिल- दादर
प्रार्थनेला माझा विरोध नाही. मशिदीवर लागलेले भोंगे खाली उतरावावे, हा निर्णय सरकारने घ्यावा. सरकारने हा निर्णय घेतला नाही तर मशिदीसमोर स्पीकरवरुन हनुमान चालीसा लावणार.
राष्ट्रवादी पक्षाच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीच राजकारण सुरु झाले. आपण जातीत बाहेर नाही पडलं तर, आपण हिंदू कधी होणार?
जेलमधून बाहेर आलेला व्यक्ती मंत्री होतो, अशी टीका राज यांनी केली. तसेच मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदशी संबंधांवरून नवाब मलिकांना अटक होते हे सगळे तुमच्या डोळ्यासमोर होतेय.
मुकेश अंबानींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवणारा सचिन वझे एकेकाळी शिवसेनेत होता. हे सहज होतं का?, देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर जिलेटीन भरलेली गाडी ठेवणे इतके सोपंय का?
मतदारांनी भाजप-सेनेला मतदान केलं ते युती म्हणून केलं. शरद पवार आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी केलं नव्हतं. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार?