Babasaheb Purandare | राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून वाहिली श्रद्धांजली
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं सोमवारी, १५ नोव्हेंबर रोजी पुण्यात निधन झाले. यावेळी राजकिय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करत शब्दांजली वाहिली. मात्र, आज पुन्हा राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'शिवाज्ञा' अशा नावाचे व्यंगचित्र काढून शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान या व्यंगचित्रात छत्रपती शिवाजी महाराज हे आपला हात पुढे करून बाबासाहेब पुरंदरेंचे स्वागत करताना दिसत आहेत. आणि बाबासाहेब पुरंदरे हे दोन्ही हात जोडून महाराजांसमोर मोठ्या श्रद्धेने लवून उभे असलेले दिसत आहे. तसेच या व्यंगचित्रात शिवाजी महाराज बाबासाहेब पुरंदरे यांना म्हणत आहे 'ये रे माझ्या गड्या, मला शोधण्यासाठी जगभर खूप पायपीट केलीस, अविश्रांत मेहनत घेतलीस, माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंस. ये आता जरा आराम कर. असा या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी काढलं आहे.