संदीप देशपांडेंवरील हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

संदीप देशपांडेंवरील हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क येथे अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Published on

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क येथे अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर अखेर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलांचे रक्त असे वाया घालवू देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत. फडतूस लोकांसाठी नाहीत, असे त्यांनी म्हंटले आहेत.

संदीप देशपांडेंवरील हल्ल्याप्रकरणी राज ठाकरेंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
...म्हणून मुख्यमंत्री पद गेले; राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंना डिवचले

संदीप देशपांडे यांच्यावरती हल्ला झाला. आत्मचरित्राची 4 पाने वाढली. घटना घडल्यानंतर अनेकांनी विचारले. पण, काही बोललो नाही. पण, एक निश्चितपणे सांगतो की ज्यांनी केलंय त्यांना पहिले समजेल की त्यांनी केलयं. माझ्या मुलांचे रक्त असे वाया घालवू देणार नाही. महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत. फडतूस लोकांसाठी नाहीत, असे म्हणत राज ठाकरेंनी हल्ल्याचा निषेध केला आहे.

दरम्यान, संदीप देशपांडे यांनीही पत्रकार परिषद घेत हल्ल्याबद्दल सांगितले. मॉर्निंग वॉकला गेलो असता 5 नंबर गेट वरून पुढे चालत होतो. पाठीमागून अचानक अज्ञातांनी हल्ला केला. मला सुरुवातीला वाटलं सिझन बॉल लागला. पण, एकने मागून स्टम्पने हल्ला केला. मी बचावासाठी दांडा पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका माझ्या हातावर बसला. यावेळी परिसरातील लोक धावून आल्याने हल्लेखोर पळून गेले, असे संदीप देशपाडे यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com