नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती, पण...; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती, पण...; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर सभा पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी नारायण राणे यांनी पक्ष का सोडला याचाही खुलासा केला आहे
Published on

मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर सभा पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी आपण पक्षातून बाहेर का पडलो, हे सांगताना नारायण राणे यांनी पक्ष का सोडला याचाही खुलासा केला आहे. नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती, असेही त्यांनी सांगितले आहे.

नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती. मी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मी नारायण राणेंशी बोललो. मी बाळासाहेबांना फोन लावला राणेंची इच्छा नाही. तर त्यांना जाऊन देऊ नको. लगेच घरी घेऊन ये, असे त्यांनी म्हंटले आहे. परंतु, बाळासाहेबांना पुन्हा फोन आला व त्यांनी नारायण राणेंना नको बोलवू, असे सांगितले. मात्र, मागून कोणतरी बोलतयं हे ऐकू येत होते.

बाळासाहेबांची भेट घडवून आणायचा प्रयत्न केला. पण बाळासाहेब आणि राणेंची भेट जी घडवून आणायचा मी प्रयत्न केला पण ती भेट ती कोणीतरी घडू दिली नाही. ज्याप्रकारे लोकांना बाहेर काढायचे राजकारण जे सुरु होते त्यांचा शेवट असा झाला आहे. त्यांचं काय झाले याचा काहीच फरक पडत नाही. त्यांचं राजकारण त्यांना लख लाभ, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com