तशी वेळ आली तर मी घरी बसेन; राज ठाकरेंचे विधान मोठं विधान
निसार शेख | चिपळूण : महाराष्ट्रबद्दलचा राग आहे ना तो तुमच्या मनातून बाहेर काढा. व्याभिचारी राजकीय तडजोड करायला लागली तर मी घरात बसेन, पण अशा तडजोडी मी करणार नाही, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. एवढेच नव्हेतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट नक्कल करत मी राजकारणी आहे आणि राजकारण करत असताना असे निर्णय घ्यावे लागतात, असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार व्हावा आमदार व्हावा, असं वाटतं. पण, तसा खासदार व आमदार होण्यासाठी तसा व्यक्तीही असणे गरजेचे आहे. लोकांना वाटलं पाहिजे की हा आपले प्रश्न सोडवू शकेल असा माणूस जिंकणे गरजेचा आहे. आपला पक्ष जिंकला पाहिजे आता मेळाव्यात संख्या किती आहे, असे विचारत 515 यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप झाला पाहिजे होईल की नाही असे सांगितले. त्यांनी वैभव खडेकर यांचे नाव घेत यांना सगळ्यांना हकायचे काम करा म्हणजे ती गुरे नाहीत हे लक्षात ठेवा असे सांगत या सगळ्याची जबाबदारी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष यांच्यावर दिली आहे.
पक्षाची शाखा नव्हे तर नाका झाला पाहिजे तुम्ही संध्याकाळी जाताना तोच नाका असे विचारताच सभागृहात एकच हशा पिकला. असे सांगत उद्या हाच नाका महिलांना व युवतींना मोठा आधार वाटला पाहिजे हे लक्षात ठेवा, असाही महत्वाचा सल्ला त्यांनी दिला. पुण्यात काय चाललं आहे यांचे त्यांनी उदाहरण दिले एका आयएस अधिकाऱ्यांचे उदाहरण देत राज ठाकरे यांनी सांगितले की तो आयएस अधिकारी मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत होता. त्याला विचारल्यावरती त्यांनी सांगितलं की, अरे तो मुख्यमंत्री टेम्पररी आहे मी परमनंट आहे, असे सांगत त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री यांच्यावरती जोरदार निशाणा साधला आहे