राज ठाकरे- मुख्यमंत्र्यांची भेट; काय झाली चर्चा?
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोलसंदर्भात भेट घेतली आहे. तब्बल एका तासापेक्षा अधिक वेळ राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक झाली. यासंदर्भात एमएच 4 च्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरु आहे. यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना दिले असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनुसार, मुंबईत एंट्री पॉईंटवर चर्चा करण्यात आली. टोल भरून पण रस्ते नीट नाहीत. आम्ही सगळे टॅक्स देतो. मग, टोल कशाला, टोल नाक्यावर पिवळी लाईन कुठे आहेत, महिला टॉयलेट सुद्धा नाही, असे मुद्दे मनसेकडून मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आले आहेत. यावर एमएच 4 च्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरु आहे. यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना दिले आहे.
15 दिवस टोलनाक्यावर एमएसआरडीसीकडून टोलवर व्हिडीओग्राफी केली जाणार आहे. त्यात एमएच 4 च्या गाड्या किती येत-जात आहेत याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर अहवाल सादर केला जाईल. वाशी टोलनाक्यासह इतर टोलनाक्यांवर सोयीसुविधांसाठी लवकरच एक समिती गठीत केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना सांगितले आहे. टोल नाक्यांवर पिवळी लाईन गायब असल्याची कबुलीही एमएसआरडीसीकडून दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.