...म्हणून मुख्यमंत्री पद गेले; राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंना डिवचले
मुंबई : मनसेचा आज 17 वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात पहिल्यांदाच साजरा झाला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. भोंगा आंदोलनावेळी १७ हजार सैनिकांवर केसेस टाकल्या. आणि पुढे काय झाले. म्हणून आपल्या वाटेला जायचे नाही मुख्यमंत्री पदावरुन जावे लागले, असे त्यांनी म्हंटले आहे.
सध्या राज्यात जे काही सुरु आहेत. ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारे आहे. इतके गलिच्छ राजकारण सुरु आहे. एवढ्या खालच्या थरांची भाषा कधी पाहिली नाही. टीव्हीवर ही लोक पाहवत नाही. किती खालच्या थराला जाऊन बोलायचे याची काही मर्यादाच उरलेली नाही. हे दाखवणे जेव्हा बंद होईल तेव्हा महाराष्ट्र सुधारलेला दिसेल. जेव्हा कधी निवडणुका होऊ दे आपण सत्तेत असणार म्हणजे असणारच. कारण जनता या सर्व जणांना विटली आहे. रोज तमाशे सुरु आहेत त्याला जनता विटली आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.
भोंग्याविरोधात आंदोलन, पाकिस्तानी कलाकार हुसकावले आपण केले. तेव्हा सो कॉल्ड हिंदुत्ववादी पक्ष माननारे कुठे होते? काय करत होते चिंतन? पण ते जे काही सांगतात की आम्ही हिंदुत्वासाठी केले. हिंदुत्व म्हणजे काय असते? तुमचे फक्त जपमाळ. कधी हिंदुत्व दिसत नाही. भोग्यांच्या प्रकरणानंतर अयोध्या दौऱ्याला विरोध कोणी केला हिंदुत्ववादीच. मला आतलं राजकारण कळलेल होते. म्हणून सांगितले आता नको. जे त्यांचे पुढे काय झाले ते माहितीच आहे. भोंगा आंदोलनावेळी १७ हजार सैनिकांवर केसेस टाकल्या. आणि पुढे काय झाले. म्हणून आपल्या वाटेला जायचे नाही मुख्यमंत्री पदावरुन जावे लागले, असा निशाणाही त्यांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे.