राज ठाकरे आणि मी दहा वर्षातील बॅकलॉग भरून काढतोय - एकनाथ शिंदे
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या आगामी चित्रपटासाठी आयोजित कार्यक्रमात एकाच मंचावर आले होते. आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र म्हटलं की शिवाजी महाराज यांचं नाव येतंच. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सिनेमे मागील काही काळात येतायत आणि ते प्रसिद्ध देखील होतं आहेत. अनेक संकटांवर मात करत महेश मांजेकर यांनी यश मिळवलं आहे.
सिनेमात वीर मराठे आहेत आणि ध्येय वेढे देखील आहेत. ध्येय वेढे इतिहास घडवतात. आम्ही देखिल मागील साडे तीन महिन्यापूर्वी एक दौड केली. कुठं कुठं गेलो माहिती नाही मात्र आम्ही जनेतच्या मनातील बाब केली. राज ठाकरे आणि मी सतत एकत्र येतोय. मागच्या 10 वर्षातील बॅकलॉग भरुन काढत आहोत.