अदानी प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची प्रश्नांची तोफ; चायनीज नागरिक त्यांच्या कंपनीत कसा?

अदानी प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची प्रश्नांची तोफ; चायनीज नागरिक त्यांच्या कंपनीत कसा?

राहुल गांधी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. याआधी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत अदानी प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्नांची तोफच डागली आहे.
Published on

मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. याआधी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत अदानी प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्नांची तोफच डागली आहे. अदानींच्या नेटवर्कच्या माध्यमातून विविध देशांतून पैसा आला, तो त्यांनी देशात विविध संपत्ती खरेदी करण्यासाठी वापरला आहे, असा आरोप करत राहुल गांधी म्हणाले त्या पैशातून अदानी एअरपोर्ट, पोर्ट खरेदी करत आहेत. हा पैसा कोणाचा आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

अदानी प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची प्रश्नांची तोफ; चायनीज नागरिक त्यांच्या कंपनीत कसा?
'त्या' मागणीवर शहाजी बापू पाटलांचा विरोधकांच्या सुरात सुर; म्हणाले...

अदानींच्या कंपनीत होणारी गुंतवणूक ही कोणाची आहे? हा पैसा कोणाचा आहे? विनोद अदानी, नासेर अली, चँग चूंग लिंग या तिघांची नावे समोर येत आहेत. तीन वृत्तपत्रांनी अदानींच्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जी-20 चे भारताला अध्यक्षपद मिळाल्यापासून अनेक प्रमुख नेते देशभरातून भारतात येत आहेत. 1 बिलियन डॉलर अदानी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशात गेले आणि पुन्हा भारतात आणले. परत आलेल्या पैशातून भारतातील अनेक मालमत्ता अदानी यांनी खरेदी केल्या आहेत. अदानी मालमत्ता खरेदी करत असताना त्यांच्याकडे असलेले पैसे हे येतात कुठून? अदानी यांच्याकडे असलेले पैसे कोणाचे आहेत त्यांचे स्वतःचे आहेत की दुसऱ्याचे आणि जर दुसऱ्याचे असतील तर कोणाचे आहेत? फॉरेन इन्व्हेस्टर्स भारतातील शेअर कसे हँडल करत आहेत, असे सवाल राहुल गांधींनी उपस्थित केले आहे.

हे काम करण्यासाठी गौतम अदानींचा भाऊ विनोद अदानी हा मास्टरमाइंड आहे. विनोद अदानींसह नासेर अली, चँग चूंग लिंग यांची नावे समोर येत आहेत. त्यात एक चायनीज नागरिक आहे. अदानी सुरक्षा व्यवस्थेत काम करतात असे असताना चायनीज नागरिक त्यांच्या कंपनीत कसा? सीबीआय, ईडी हे अदानीची चौकशी का करत नाहीत? सेबीच्या अधिकाऱ्याने चौकशी केली. त्यानंतर त्याला अदानीच्या कंपनीत डायरेक्टर करण्यात आले. या सर्व प्रकरणाची चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी का करत नाही, अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com