Rahul Gandhi
Rahul GandhiTeam Lokshahi

अग्निवीर योजना आरएसएसची कल्पना, अजित डोवालांनी लष्करावर लादली; राहुल गांधींचे घणाघात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख करत महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, गरिबी आणि अदानी या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला
Published on

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी लोकसभेत आभार प्रस्तावावर चर्चा झाली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख करत महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, गरिबी आणि अदानी या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. अग्निवीर योजना ही योजना अजित डोवाल यांनी लष्करावर लादली आहे. ही आरएसएसची कल्पना आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

Rahul Gandhi
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांचा अदानींना फायदा; राहुल गांधींचा आरोप

यात्रेदरम्यान जनतेशी बोलण्याची आणि त्यांच्या समस्या ऐकण्याची संधी मिळाल्याचे राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले की, आता तुम्ही अग्निवीर योजनेचे कौतुक केले, पण लष्कर भरतीसाठी पहाटे चार वाजता रस्त्यावर धावणाऱ्या बेरोजगार तरुणांना हे मान्य नाही. चार वर्षांनंतर आम्हाला सैन्यातून हाकलून दिले जाईल, असे या लोकांचे म्हणणे आहे.

राहुल गांधी म्हणाले, लष्करातील निवृत्त अधिकारी म्हणत आहेत की अग्निवीर योजना लष्कराची नाही. ही योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आली आहे. गृह मंत्रालयाकडून आले आहे. तो लष्करावर लादण्यात आला आहे. अजित डोवाल यांनी लादले आहे. समाजात बेरोजगारी आहे, अग्निवीरानंतर समाजात हिंसाचार वाढेल. अजित डोवाल यांचे नाव घेतल्यावर सत्ताधारी पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आणि तुम्ही त्यांचे नाव घेऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. ते का घेऊ शकत नाही, असे राहुल गांधी आणि काँग्रेसचे सदस्यांनी विचारले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com