शिवतीर्थावर शिंदे-ठाकरे गटात राडा; पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, केली 'ही' मोठी कारवाई

शिवतीर्थावर शिंदे-ठाकरे गटात राडा; पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, केली 'ही' मोठी कारवाई

ठाकरे व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी अखेर ५० ते ६० अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
Published on

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी संध्याकाळी स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. मात्र यावेळेस ठाकरे व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी अखेर ५० ते ६० अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

शिवतीर्थावर शिंदे-ठाकरे गटात राडा; पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, केली 'ही' मोठी कारवाई
भुजबळांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी; संभाजीराजेंची मागणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात हाणामारी प्रकरणी आता पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. याप्रकरणी मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ५० ते ६० अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पोलीस सर्वांची ओळख पटवून कारवाई करतील, असे सांगत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी भादंवि कलम १४३, १४५, १४७, १४९ आणि बॉम्बे पोलिस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

काय आहे नेमके प्रकरण?

उद्धव ठाकरे कुटुंबीय आणि ठाकरे कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी उद्या स्मृतिस्थळावर येणार असल्याने एकनाथ शिंदे यांनी आदल्या दिवशीच अभिवादन केले. यानंतर शिंदे निघताच ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि अनिल देसाई तसेच इतर पदाधिकारी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर दाखल झाले आहेत. यावेळी ठाकरे-शिंदे गटाचे सैनिक एकमेकांसमोर आले असून जोरदार राडा झाला. यावेळी एकमेकांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com