राजकारण
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 'या' ठिकाणी काका-पुतण्या पहिल्यांदाच एका मंचावर दिसणार
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना साथ देत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला.
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना साथ देत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवारांनी घेतली. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या.
यातच आता अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर दिसणार असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने येत्या 1 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं आहे. या मेळाव्याला अजित पवार आणि शरद पवार यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच हे दोघं एकाच मंचावर येणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.