मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांच्या हालचालीवर लक्ष ठेवा; कोण म्हणाले असं?

मुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांच्या हालचालीवर लक्ष ठेवा; कोण म्हणाले असं?

भाजपाच्या रविवारी पुण्यात लोकसभा नियोजन बैठक पार पडली.
Published by :
Team Lokshahi
Published on

भाजपाच्या रविवारी पुण्यात लोकसभा नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच कालच्या बैठकीत राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला गेला. तसेच बुथनिहाय नियोजन कसे असावे याबाबतही मार्गदर्शन केले गेले असल्याचे सांगितले जात आहे.

यातच आपापल्या लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवा. गाफील राहू नका, पक्षाची ताकद जोमाने वाढवा. मित्रपक्षांच्या जास्त प्रेमात पडू नका". अशा सूचना राष्ट्रीय संघटक सरचिटणीस बी एल संतोष यांनी दिल्याची माहिती मिळत आहे.

या बैठकीला राष्ट्रीय संघटक सरचिटणीस बी एल संतोष, सहसंघटक मंत्री शिव प्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन उपस्थित होते. आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी भाजपची काल पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीत रामजन्मभूमी सोहळा, सुपर वॉरियर्स यासह विविध उपक्रमांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com