Prithviraj Chavan : शिवसेनेचे काय, मला माहित नाही

Prithviraj Chavan : शिवसेनेचे काय, मला माहित नाही

एकनाथ शिंदेंवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया
Published on

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क होत नसल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यामुळे ठाकरे सरकारला धोका निर्माण झाला आहे. यावर शिवसेनेचे काय झालं मला माहित नाही. परंतु, हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शिवसेनेचे काय झालं मला माहित नाही. पण, महाविकास आघाडी सरकार फुटणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच, विधान परिषदेत कॉंग्रेसचा एक उमेदवाराचा पराभव झाला आहे. याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, जो प्रकार घडला अत्यंत दुर्दैवी आहे. आम्हाला विजयाची खात्री होती. या सगळ्याचं विश्लेषण मी करणार आहे. जो प्रकार घडला त्याचा आढावा मी आता घेणार आहे. नेमकं काय घडलं त्याची चर्चा आम्ही आज करणार आहोत

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार भाई जगताप हे विजयी झाले. परंतु, चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. तर, भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मतं फोडण्यात यशस्वी झाल्याचं बोललं जातं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com