Presidential Election Result : पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण; द्रौपदी मुर्मू आघाडीवर
नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पहिली फेरी संपली आहे. पहिल्या फेरीत द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आघाडीवर आहेत. दरम्यान, यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) आणि द्रौपदी मुर्मू यांच्यापैकी कोण भारताचे पुढील राष्ट्रपती होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पहिल्या फेरीतील मतमोजणी मतमोजणी संपली आहे. पहिल्या फेरीत 748 मतांची मोजणी झाली आहे. यामध्ये द्रौपदी मुर्मू 540 मतांनी आघाडीवर आहेत. तर यशवंत सिन्हा यांना 208 मतं मिळाली आहेत. द्रौपदी मुर्मूंच्या मतांचे मूल्य 3 लाख 78 हजार इतकं आहे. तर यशवंत सिन्हांच्या मतांचं 1 लाख 45 हजार इतकं आहे. पहिल्या फेरीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या मतांची मोजणी झाली. यामध्ये 15 खासदारांची मतं बाद झाली आहेत.
दरम्यान, राष्ट्रपती पदासाठी भाजपा नेतृत्वातील रालोआच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधी आघाडीचे यशवंत सिन्हा यांच्यात 18 जुलै रोजी लढत झाली आहे. या निवडणुकीचे मतमोजणी आज करण्यात येत आहे. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. असे त्या झाल्यास आदिवासी समाजाशी संबंधीत असलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती बनतील.