राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल; जल्लोषात स्वागत

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल; जल्लोषात स्वागत

Draupadi Murmu हॉटेल लीलामध्ये खासदार, आमदारांची भेट घेणार
Published on

मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने (ShivSena) भाजप प्रणित एनडीएच्या (NDA) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा दिला आहे. याचदरम्यान भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज दाखल झाल्या आहेत. त्यांचे विमानतळावर दिमाखात स्वागत करण्यात आले.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल; जल्लोषात स्वागत
President Election 2022 : द्रौपदी मुर्मू आज मुंबईत; पाठिंबा देऊनही उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू मुंबईत दाखल झाल्या असून विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, केंद्रीय मंत्री भागवत कराड, भारती पवारही उपस्थित होते. हॉटेल लीलामध्ये द्रौपदी मुर्मू यांचे पारंपारिक आदिवासी नृत्यांने स्वागत करण्यात आले. हॉटेलमध्ये त्या शिंदे गटाच्या खासदार, आमदारांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रपती पदाची निवडणूक 18 जुलै रोजी होत आहे. द्रौपदी मुर्मू एनडीएच्या उमेदवार आहेत. तर यशवंत सिन्हा युपीएचे उमेदवार आहेत. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी नुकताच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर द्रौपदी मुर्मू उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार का याची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com