आधी रात्री फुकायचे आता सकाळी देखील फुकतात; भाजप नेत्याचे राऊतांवर शरसंधान

आधी रात्री फुकायचे आता सकाळी देखील फुकतात; भाजप नेत्याचे राऊतांवर शरसंधान

संजय राऊत यांच्या टीकेला भाजप नेत्याचे जोरदार प्रत्युत्तर
Published on

मुंबई : आईसमान पक्ष बदलणाऱ्यावर काय बोलायचं, अशी जोरदार टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर साधले आहे. याला भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आधी रात्री फुकायचे आता सकाळी देखील फुंकतात, फुंकऱ्यांबद्दल काय बोलायचं, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी संजय राऊतांवर शरसंधान साधले.

आधी रात्री फुकायचे आता सकाळी देखील फुकतात; भाजप नेत्याचे राऊतांवर शरसंधान
उध्दव ठाकरेंचे 'ते' विधान दुर्देवी; विनोद तावडेंची प्रतिक्रिया

ठाकरे गटाच्या सामना मुखपत्रातून देवेंद्र फडणवीसांवर काडतूस गृहमंत्री फडतूस भाषेत आरोळी ठोकतात, अशी टीका केली आहे. यावर प्रसाद लाड म्हणाले की, तीन पैशाचा तमाशा महाराष्ट्रात सुरु आहे. तीन पैशांच्या तमाशा वाल्यांना जेव्हा बोलायच तेव्हा आम्ही बोलू, अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरेंवर केली आहे.

तर, आदित्य ठाकरे यांचं ऐकतोय कोण? देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा किती स्वच्छ आहे हे महाराष्ट्र जाणतो. बाप-लेकांनी मिळून पालिकेत भ्रष्टाचार केला. 25 वर्ष पालिका लुटली आहे. गाळ देखील खाल्ला, चिखल देखील खाल्ला, मिठी नदी प्यायले, अशी टीका करत फडणवीस यांना आदित्य ठाकरेंनी सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याविरोधात आता काँग्रेसकडून मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावरही प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भ्रष्टाचाराने माखलेली काँग्रेस कितीही लोकांसमोर मशाल घेऊन गेली तरी त्यांना सूर्य दिसणार नाही. १३५ वर्षांच्या काळात काँग्रेस स्वातंत्र्य पूर्वी वेगळी होती. आताची काँग्रेस भ्रष्ट आहे. त्यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहे, हे लोकांना कळले आहे, असा घणाघात लाड यांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com