Praniti Shinde : लाडकी बहिण कधीही निवडणुकीनंतर सावत्र होण्याची शक्यता

Praniti Shinde : लाडकी बहिण कधीही निवडणुकीनंतर सावत्र होण्याची शक्यता

सोलापुर काँग्रेस कमिटी कार्यालयात खासदार प्रणिती शिंदेच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं. यावेळी
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सोलापुर काँग्रेस कमिटी कार्यालयात खासदार प्रणिती शिंदेच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर टीका केली आहे.

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, लाडकी बहिण योजना ही एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे, स्टंटबाजी आहे. अर्थात या माध्यमातून सन्मान होत असेल तर ठिक आहे पण खरं तर भाजपची मानसिकता ही महिलांच्या विरोधातील आहे. ती लाडकी बहिण कधीही निवडणूकीनंतर सावत्र होण्याची शक्यता आहे.

यासोबतच त्या म्हणाल्या की, हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. जे मध्यप्रदेश सरकारने केलं पण आता लोक खूप हुशार झालं आहेत. लोकांना माहित आहे की हे खेळ फक्त इलेक्शनपुरतं असतात. काँग्रेस, महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली दिसेल. असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com