औरंगजेबच्या कबरीला प्रकाश आंबेडकरांनी दिली भेट; भेटीनंतर म्हणाले, मिटवणार आहात का?...
छ. संभाजीनगर: राज्यात मागील काही दिवसांपासून औरंगजेब राज्यात प्रचंड राजकारण सुरू आहे. तर दुसरीकडे काही भागात दंगल, राडा अशासारख्या घटना देखील घडल्याचे समोर आले. त्यातच आता राज्याच्या राजकारणात गदारोळ निर्माण करणारी बातमीसमोर आली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अचानक छ. संभाजीनगरमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
औरंगजेबच्या कबरीला भेट दिल्यानंतर काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
औरंगजेबच्या कबरीला भेट दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, खुलाताबादमध्ये आलो हे ऐतिहासिक गाव आहे. बऱ्याच वर्षांनी भेट दिली. औरंगजेब 50 वर्षे राज्य करुन गेला ना? ते तुम्ही मिटवणार आहात का? आणि औरंगजेबाचे राज्य का आलं? तर बाबासाहेबांनी सरळ सांगितलं होत. जयचंद इथे आले आणि झाले राज्या- राज्यांमध्ये त्या जयचंदांना शिव्या घाला त्या औरंगजेबाला शिव्या घाला ना असेल ताकद तर जयचंद शिव्या घाला. जयचंद यांनी इथे येऊन राज्याचे राजवाडे बुडवले त्यांना शिव्या घाला ना त्यांना शिव्या घालण्याची ताकद नाहीये. असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, औरंगाबाद हे दुसरं कॅपिटल व्हावं हे तुघलकापासून चालू आहे. एका बाजूला पाकिस्तान दुसऱ्या बाजूला चीन त्यामुळे देशाचे सुरक्षित कॅपिटल औरंगबाद असू शकते. हे बाबासाहेबांनी सुचवलं होत. मी भावनेवरती जात नसतो. मी देशाच्या सुरक्षितेबाबत बघत असतो. असे देखील मत त्यांनी यावेळी मांडले.