'शिवसेना-वंचित युती रोखण्यासाठी फडणवीस राष्ट्रवादीच्या चाव्या दाबतील'
मुंबई : शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती आता अंतिम टप्प्यात आली आहे. याबद्दल खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली असून आगामी मुंबई महापालिका एकत्रित लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना आणि आमचं बोलणं सुरु आहे. बीएमसी निवडणुकांमध्ये सोबत जाण्याची शक्यता आहे, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. परंतु, शिवसेना-वंचित युती रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या चाव्या दाबतील, अशी टीका त्यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेना आणि वंचित आमची बोलणी सुरु सुरु आहे. बीएमसी आणि इतर निवडूनमध्ये सोबत जायचे अशी बोलणी सुरु असून आमचा निर्णय झाल्यावर जाहीर करू, अशी माहिती त्यांनी दिली आहे. परंतु, आमच्या युतीला राष्ट्रवादीचा थेट विरोध आहे. तर, काँग्रेसचा देखील छुपा विरोध आहे.
मुंबईमध्ये आम्ही 83 जागांवर तयारी केली होती. आता आपण बघू. मुस्लिम यांचा ठरलंय कि भाजप नकोच आहे. त्यामुळे आम्हाला सकारात्मक वाटत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आली नाही आणि आम्ही व शिवसेना एकत्र लढलो तरी हा लॉस भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मी उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे कि, ममता बॅनर्जी असतील किंवा अन्य मोदीविरोधी पक्ष एकत्र आणावे. याचा पुढाकार उद्धव ठाकरे यांनी घ्यावा. आणि काँग्रेस सोबत आहे, असं सांगावे.
तसेच, देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणणे कमीपणा वाटते. त्यामुळे ते मुख्यमंत्री म्हणून प्रयत्न करतील. यासाठी ते राष्ट्रवादीच्या चाव्या दाबतील. कदाचित वंचितला घेऊ नका म्हणून प्रयत्न करतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळं लढावे, असा प्रयत्न करतील. ज्यांच्या चौकशी सुरु आहे तिथून प्रयत्न करतील. त्यामुळे मला वंचित आणि शिवसेना जास्त सोयीचे वाटते.
काँग्रेसमध्ये धमक राहिलेली नाही. मोदी यांना अंगावर घेऊ शकत नाही. पण, ब्लॅक लिस्ट मधून बाहेर आली. म्हणून अल्टर्नेटीव्ह फ्रंट उभे करावे आणि त्यांना विचारावे, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हंटले आहे.