दिवाळीनंतर गोध्रा, मणिपूरसारखे कांड होण्याची शक्यता; प्रकाश आंबेडकरांचे भाकीत

दिवाळीनंतर गोध्रा, मणिपूरसारखे कांड होण्याची शक्यता; प्रकाश आंबेडकरांचे भाकीत

प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना मोठे भाकीत वर्तवले आहे.
Published on

छत्रपती संभाजीनगर : निवडणुकात कत्तल की रात होईल. दिवाळी नंतर गोध्रा आणि मणिपूर सारखे कांड होण्याची शक्यता असल्याचे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. सनातन धर्माचे लोक अफवा पसरवत आहेत. कितीही पेटवण्याचा प्रयत्न केला, स्फोटक परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी मतदान होईपर्यंत शांत रहा. सनातनाच्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दिवाळीनंतर गोध्रा, मणिपूरसारखे कांड होण्याची शक्यता; प्रकाश आंबेडकरांचे भाकीत
रस्त्याला तडा गेला, खराब झाला तर मी बुलडोजर खाली टाकीन; नितीन गडकरींचा कॉन्ट्रक्टरला इशारा

निवडणुकीचे वारे वाहायला लागले आणि वंचित बहुजन आघाडी प्रचार सभा आयोजित करत आहे. महाराष्ट्रात एका वर्षात विधानसभा निवडणुका होतील. स्थानिक उद्योजकांपेक्षा बाहेरच्या उद्योजकांना जमिनी दिल्या आहेत. राजकर्ते हे व्यापारी झाले असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पूर्ण राज्यभर लक्ष असणार आहे. वंचित आघाडी 48 जागा लढणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

आघाडीबाबत आंबेडकरांना विचारले असता ते म्हणाले, तुम्ही प्रश्न खरगे यांना विचारा. आम्हाला विचारायची गरज नाही. जबरदस्तीने लग्न होत नाही, जबरदस्तीने लग्न केले तर टिकते का? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे. लोकसभेसाठी शिवसेना आणि वंचित आघाडी असणार, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

दरम्यान, परदेशी आपल्याला टेरेरिस्टच्या नजरेने पाहतात. याबाबत पंतप्रधान मोदी बाबांनी बोलावं. मोदींची 56 इंचाची छाती 24 इंचाची झाली. निवडणुकांपर्यंत 20 इंचाची होईल, असा टोला त्यांनी पंतप्रधानांना लगावला आहे. इंदिरा गांधी पाकिस्तानचे 4 ते 5 तुकडे केले असते. कंगाल देश आपल्यावर गोळीबार करतो आणि हे आपण फक्त पाहायचं, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com