चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा आंबेडकरांनी घेतला समाचार; म्हणाले, खोक्याच्या भाषेत...
राज्यात सध्या अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. त्यातच राजकीय मंडळींकडून वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी देखील वादग्रस्त विधान केले होते. हा वाद अद्यापही शांत झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर काल भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावरूनच सध्या प्रचंड गदारोळ सुरु आहे. यावरच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाटील यांच्या या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
" डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले किंवा भाऊराव पाटील यांनी लोकांकडून पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या. मात्र, पाटलांनी यांनी गोळवळकर, हेगडेवार यांचे नाव घेतल नाही. याचा अर्थ गोळवळकर आणि हेगडेवार यांनी लोकांकडून पैसे घेतले नाही. मात्र, आजच्या शब्दामध्ये खोक्याच्या भाषेत पैसे घेतले आणि स्वतःच्या संस्था उभ्या केल्या. याची कबुलीच चंद्रकांत पाटीलांनी दिल्यामुळे आम्ही त्यांचे जाहीर अभिनंदन करतो" असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पैठण येथील कार्यक्रमात बोलत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या केल्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. असं म्हणताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातलं मफलर पुढे केले. ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.