रोहित पवारांनी  दादांच्या 'त्या' निर्णयाचे स्वागत करावं : प्रफुल पटेल

रोहित पवारांनी दादांच्या 'त्या' निर्णयाचे स्वागत करावं : प्रफुल पटेल

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल हे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ते पहिल्यांदाच गोंदिया आपल्या स्वगावी आले.
Published on

उदय चक्रधर | गोंदिया : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल हे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ते पहिल्यांदाच गोंदिया आपल्या स्वगावी आले. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवार जर मुख्यमंत्री झाले तर मी त्यांच्या स्वागत करेल, असे वक्तव्य केले होते. यावर प्रफुल पटेल यांना प्रश्न केले असता रोहित पवार यांनी अजित पवार यांनी जे पाऊल उचलले आहे त्याचे देखील स्वागत करायला पाहिजे अशी त्यांना माझी आग्रहाची विनंती असल्याचे म्हंटले आहे.

रोहित पवारांनी  दादांच्या 'त्या' निर्णयाचे स्वागत करावं : प्रफुल पटेल
दिल्लीतील ‘आका’साठी अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी दिली का? पटोलेंचे टीकास्त्र

शपथ पत्र भरून घेणे हे निवडणूक प्रक्रियेचा भाग

राष्ट्रवादी काँग्रेस सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर शपथपत्र भरून घेत आहे. हा एक निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे आणि भविष्यात याचा फायदा राष्ट्रवादीला होण्यासाठी महाराष्ट्रासोबत जिल्हा आणि तालुकामध्ये सध्या दादा गटाकडून शपथ पत्र कार्यकर्त्यांकडून भरून घेण्याचा कामही सुरू असल्याबाबतचे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

नाना पटोले यांनी काय म्हटलं या विषयी मी काही बोलणार नाही

नाना पटोले यांनी प्रफुल पटेल यांच्यावर टीका करीत राष्ट्रवादीच्या फुटीर नेत्यांना आता महाराष्ट्राची सत्ता काबीज करायचे, असे वक्तव्य केले होतं. यावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, कोणी काय म्हटलं याकडे मी लक्ष देत नाही. परंतु, महाराष्ट्राचा अजित पवार यांच्यासारखा कर्तबगार नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा ही माझी आजही इच्छा आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले आहे.

एक कर्तबगार नेतृत्वाला महाराष्ट्र कधीतरी संधी देईल

आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायला 20 वर्षे लागतील, असे वक्तव्य केले. त्यावर प्रफुल पटेल यांनी मी एकनाथ शिंदेंना आज हटवा असं म्हटलं नाही. तर एक कर्तबगार नेत्याला महाराष्ट्र कधीतरी संधी देईल, असा विश्वास मला आहे, असे वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com