एकनाथ शिंदेंच्या चालीने उद्धव ठाकरे चेकमीट
admin

एकनाथ शिंदेंच्या चालीने उद्धव ठाकरे चेकमीट

उद्धव ठाकरेंच्या बैठकीत 17 तर एकनाथ शिंदेंकडे 42 आमदार. गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 42 आमदारांचा व्हिडिओ जारी केला. दुसरीकडे शिवसेनेच्या बैठकीला फक्त 17 आमदार होते.
Published by :
Team Lokshahi
Published on
admin

महाराष्ट्रातील उद्धव सरकार कोसळणे आता जवळपास निश्चित झाले आहे. गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 42 आमदारांचा व्हिडिओ जारी केला. दुसरीकडे शिवसेनेच्या बैठकीला फक्त 17 आमदार होते. शिवसेनेच्या वेगळा गट स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे गटाला 37 आमदारांची गरज आहे.

एकनाथ शिंदेंच्या चालीने उद्धव ठाकरे चेकमीट
मातोश्रीची दारे अडीच वर्ष आमच्यासाठी बंद होती, उद्धव ठाकरेंना आमदाराचे खरमरीत पत्र

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजपमध्येही सरकार स्थापनेबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. यासोबतच केंद्रात दोन मंत्रीपदेही देऊ करण्यात आली आहेत.

एकनाथ शिंदेंच्या चालीने उद्धव ठाकरे चेकमीट
शिंदेच्या टि्वटमुळे टि्वस्ट : शिवसेना कोणाची? शिंदेची की उद्धव ठाकरेंची?
admin

यापूर्वी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एक पत्र शेअर केले आहे. संजय शिरसाट यांनी हे पत्र लिहिले असले तरी त्यात सर्व आमदारांच्या भावना सांगण्यात आल्या आहेत. पत्रात लिहिले आहे- शिवसेना आमदारांसाठी तुमचे दरवाजे नेहमीच बंद होते. तुम्ही या आमदारांचे ऐकले नाही. दुसरीकडे शिंदे यांनी नेहमीच आमदारांचे ऐकले.

शरद पवारांनीही आमदारांची बैठक बोलावली आहे. तर, भाजपने एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.

एकनाथ शिंदेंच्या चालीने उद्धव ठाकरे चेकमीट
शिवसेनेला धक्के पे धक्के : मुंबईतील दोन आमदार गुवाहटीत
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com