नव्या संसद भवनात आता आपण जात आहोत पण जुनं संसद...; पंतप्रधान मोदी म्हणाले
संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाचा दुसरा दिवस नव्या संसदेतून सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
नरेंद्र मोदी म्हणाले की, जुनं संसद भवन प्रेरणादायी आहे. सब का साथ, सब का विकास याच संसदेत झालं. संसदेत काम करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. महत्वाचे निर्णय याच वास्तूमध्ये घेण्यात आले. जुनं संसद भवन ऐतिहासिक. संसदेतून वार्तांकन करणाऱ्यांना सलाम. आपण ऐतिहासिक संसदभवनातून निरोप घेत आहे. नवं संसद उभारण्यासाठी लोकांनी अधिक मेहनत घेतली.
तसेच मोदी म्हणाले की, नव्या भवनात आता आपण जात आहोत पण जुनं संसद भवन पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहिलं. संसदेची जुनी वास्तू सोडणं भावूक क्षण. जी-20 परिषद यशस्वी होणं, हे संपूर्ण देशाचं यश आहे. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत. यामध्ये देशवासीयांचा घाम गाळला गेला आहे. नवीन संसद भवनात जाण्यापूर्वी देशाच्या संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासाचे स्मरण करूया. असे मोदी म्हणाले.