ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिदीन...; पंतप्रधान मोदींचा विरोधकांच्या आघाडीवर हल्लाबोल

ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिदीन...; पंतप्रधान मोदींचा विरोधकांच्या आघाडीवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर इंडिया या नावावरुन जोरदार टीका केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ झाला आहे.
Published on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर इंडिया या नावावरुन जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीची थेट ईस्ट इंडिया कंपनीशी तुलना केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच गदारोळ झाला आहे. यावरुन विरोधकांनी पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवली आहे.

ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिदीन...; पंतप्रधान मोदींचा विरोधकांच्या आघाडीवर हल्लाबोल
खेकड्यांना चांगलं सांभाळलं असतं तर...; गुलाबराव पाटलांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

संसदेत मणिपूरवरून संघर्ष सुरूच आहे. यासंदर्भात आज भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल करत दिशाहीन विरोधक आजपर्यंत पाहिला नसल्याचे सांगितले. नुसते इंडियाचे नाव घेऊन काही होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही इंडिया लावले होते केली होती. इंडियन मुजाहिदीनच्या नावावरही इंडिया शब्द होता, अशी जोरदार टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या या टीकेवर राहुल गांधी यांनी पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट म्हणाले की, मोदीजी तुम्ही आम्हाला जे हवे ते म्हणू शकता. आम्ही भारत आहोत. आम्ही मणिपूरची परिस्थिती नीट करण्यास मदत करू आणि प्रत्येक स्त्री आणि मुलाचे अश्रू पुसू. आम्ही राज्यातील सर्व जनतेसाठी प्रेम आणि शांतता परत आणू. आम्ही मणिपूरमध्ये भारताच्या कल्पनेची पुनर्बांधणी करू, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचारावरून संसदेत सतत गदारोळ सुरू आहे. अधिवेशनाचे तीन दिवस गदारोळात गेले. आज चौथा दिवस असून गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करावे लागले, तर राज्यसभेतही सतत गदारोळ सुरू आहे. मणिपूरवरील चर्चेचे नियम आणि पंतप्रधानांच्या उत्तराबाबत संदिग्धता आहे. जर विरोधक संसदेत पंतप्रधानांच्या निवेदनाच्या मागणीवर ठाम आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com