नव्या संसद भवनात पंतप्रधान मोदींकडून महिला आरक्षण विधेयकाची घोषणा

नव्या संसद भवनात पंतप्रधान मोदींकडून महिला आरक्षण विधेयकाची घोषणा

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज नवीन संसद भवनात कामकाज सुरु झाले.
Published on

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज नवीन संसद भवनात कामकाज सुरु झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना इमारत बदलली आहे आणि मला वाटते की भावना देखील बदलली पाहिजे, असे म्हंटले आहे. तसेच, महिला आरक्षणाचे विधेयक मांडले आहे.

नव्या संसद भवनात पंतप्रधान मोदींकडून महिला आरक्षण विधेयकाची घोषणा
'विघ्नहर्ता' जनतेसमोरील सर्व अडथळे दूर करील, मुख्यमंत्र्यांची गणेशाचरणी प्रार्थना!

पंतप्रधान मोदी म्हणाले, येत्या काही दिवसांत देशात निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत सत्ताधारी पक्षात कोण बसणार आणि विरोधी पक्षात कोण बसणार हे जनताच ठरवेल. नवीन ठराव घेऊन नव्या संसदेत या आणि नव्या भारताची पायाभरणी करा. भूतकाळातील कटुता विसरून पुढे जायचे आहे.

आरक्षणावर बोलताना ते म्हणाले, महिलांसाठी इतिहास बदलण्याची वेळ आली आहे. महिला आरक्षण विधेयक अनेकदा मांडण्यात आले आहे. त्याला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. आमचे सरकार एक मोठी घटनादुरुस्ती विधेयक सादर करत आहे. या विधेयकात नारी शक्ती वंधन कायद्याच्या माध्यमातून आपली लोकशाही अधिक बळकट होणार आहे. यासाठी मी आमच्या माता, भगिनी आणि मुलींचे अभिनंदन करतो आणि या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्याचा आमचा निर्धार आहे.

मी या सभागृहातील माझ्या सर्व सहकार्‍यांना विनंती करतो की, ते सर्वानुमते मंजूर करा. महिला आरक्षण विधेयक आता नारी शक्ती वंदन कायदा म्हणून ओळखले जाणार आहे. नारी शक्ती वंदन कायद्यामुळे महिलांना बळ मिळेल आणि त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आजची तारीख भारताच्या इतिहासात अजरामर झाली आहे, असेही मोदींनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com