13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ; मोदींनी केल्या मोठ्या घोषणा

13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ; मोदींनी केल्या मोठ्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त 'पीएम विश्वकर्मा योजना' लाँच केली. यादरम्यान दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले.
Published on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त 'पीएम विश्वकर्मा योजना' लाँच केली. यादरम्यान दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांनी विश्वकर्मा सहकाऱ्यांना प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि साधनांचा मंत्र दिला. आता सरकार तुमचे मार्केटिंगही करेल, असेही मोदी यावेळी म्हणाले आहेत.

13 हजार कोटींच्या विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ; मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
संजय राऊत फक्त दिखावा करतात; भुमरेंचा टोला

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मला हे करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. आमच्या विश्वकर्मा सदस्यांमध्ये सामील व्हा. पीएम विश्वकर्मा योजना आजपासून सुरू करण्यात आली आहे, ही योजना कलाकार आणि कारागिरांसाठी आशेचा किरण म्हणून उदयास येईल. आज रेफ्रिजरेटरचे युग आले आहे, पण या जमान्यातही लोकांना मडके आणि मडक्याचे पाणी प्यायला आवडते. ते जगात कुठेही गेले तरी त्यांचे महत्त्व कायम राहील. त्यामुळे या विश्वकर्मा साथीदारांना ओळखणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या मागे उभे राहा.

विश्वकर्मा साथीदारांची ताकद आणि समृद्धी वाढवण्यासाठी आमचे सरकार सहयोगी म्हणून पुढे आले आहे. या योजनेत 18 विविध प्रकारची कामे करणाऱ्या विश्वकर्मा सहकाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये लाकूडकाम करणारे सुतार, लोहार, लोखंडी काम करणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार, चपला बनविणारे, केस कापणारे, हार करणारे आणि शिंपी यांचा समावेश होतो. भारतातील ही स्थानिक उत्पादने जागतिक बनवण्यात मोठी भूमिका बजावली जाईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com