sanjay raut, eknath khadse
sanjay raut, eknath khadseTeam Lokshahi

संजय राऊत यांचा ६० तर खडसेंचा ६७ दिवस फोन टॅप

शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप करत असल्याचा आरोप
Published by :
Team Lokshahi
Published on

शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut)यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप करत असल्याचा आरोप केला होता. केंद्रीय संस्थांकडून हे फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता या नेत्यांच्या अवैध फोन टॅपिंग प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. संजय राऊत (sanjay raut) यांचा फोन 60 दिवस तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse)यांचा फोन 67 दिवस टॅपिंगवर (phone tapping)ठेवण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते.

संजय राऊत यांचा सात दिवस फोन टॅप करण्यात आला आणि दुसऱ्यांदा एसीएस होमच्या परवानगीने 60 दिवस फोन टॅप करण्यात आला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तत्कालीन एसीएस होम एस कुमार यांचा जबाबही नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचं नाव एसआयडीच्या स्वरुपात फोन टॅपिंगच्या विनंतीमध्ये असल्याचं कुमार यांनी आपल्या जबाबात सांगितलं. त्यांच्या फोन टॅपिंगची माहिती कोणालाही कळू नये म्हणून एसआयडीकडून चुकीच्या नावाने विनंती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दहापेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवले असल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलिसांनी दोन वेळा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला असून, एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचेही जबाब व्हिक्टिम कॅपॅसिटीमध्ये पोलिसांनी नोंदवले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com