पवारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला, पोलिसांनी 24 तासाच्या केली कारवाई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी फोन करून पवार यांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सिल्व्हर ओक बंगल्यावरील आॅपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार गावदेवी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता त्या व्यक्तीचा पोलिसांनी 24 तासाच्या आता त्या व्यक्तीचा शोध घेतला आहे. फोन करणारी व्यक्ती ही मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांत अज्ञाता विरोधात आयपीसीच्या कलम 294, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला.
शरद पवार यांना धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. पोलिसाच्या माहितीनुसार, शरद पवार यांना धमकी देणारी व्यक्ती बिहारची रहिवाशी आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तो सतत फोन करून धमक्या देत होता, असे पवार यांनी सांगितले.