बीड/परळी: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मी पोटच्या मुलाप्रमाणे जपला - पंकजा मुंडे
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला. मात्र अडी अडचणी आल्या कधी दुष्काळ आला अगोदरचे कर्ज पुन्हा पुढे आले आणि या सगळ्या प्रश्नांमुळे हा साखर कारखाना बंद राहिला. मात्र आता पुन्हा नव्याने या साखर कारखान्याची सुरुवात होणार आहे. हा साखर कारखाना आता ओंकार ग्रुपने चालवायला घेतलाय. आणि यापूर्वीच्या क्षमतेपेक्षा दुप्पट क्षमतेने साखर कारखाना चालणार असं वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे वैद्यनाथ साखर कारखाना माझं चौथ आपत्त अस सांगायचे, पंकजा मुंडे यांनी सुद्धा माझ्या मुलाला लहान असताना मी जसे काजळ लावायचे त्याला नटवायचे आणि काजळ लावायचे कारण त्याला कुणाची नजर लागू नये. कारण त्याला कुणाची नजर लागू नये म्हणून, तसंच मी या साखर कारखान्याला जपलं असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.