पंकजा मुंडेंना मोठा धक्का! बाजार समितीत भाजपचा सुपडा साफ; राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

पंकजा मुंडेंना मोठा धक्का! बाजार समितीत भाजपचा सुपडा साफ; राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

बीड जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली.
Published on

विकास माने | बीड : बीड जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज हाती आला. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना मोठा पराभव स्वीकारावा लागलाय. तर राष्ट्रवादीने बाजार समितीवर एक हाती वर्चस्व निर्माण केलंय.

पंकजा मुंडेंना मोठा धक्का! बाजार समितीत भाजपचा सुपडा साफ; राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
बारसुवरुन ठाकरे गटामध्येच वेगवेगळं मतप्रवाह; अजित पवारांचे मोठे विधान, विकासला विरोध नाही परंतु...

जिल्ह्यातील 8 बाजार समितीमध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. यातील वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती लागला असून राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती वर्चस्व निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास महाआघाडीचे 18 पैकी 18 सदस्य निवडून आले आहेत.

तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ मुंडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा सुपडा साफ झाला आहे. यानंतर राष्ट्रवादीने एकच जल्लोष केलेला पाहायला मिळाला. यापूर्वी नगरपंचायत निवडणुकीत देखील पंकजा मुंडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे वर्चस्व येथे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आज परळीची देखील मतदान प्रक्रिया पार पडली असून याचा निकाल उद्या हाती येणार आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com