Hitendra Thakur : मविआ की भाजप कुणाला देणार बविआ मतं; 4 तास बंद दाराआड चर्चा
शिवसेना शिष्टमंडळ आणि नेते हितेंद्र ठाकूर यांच्यात 4 तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. मात्र, बंद दाराआड झालेल्या चर्चेला यांनी काैटुंबीक चर्चेचे स्वरूप देत काय चर्चा झाली यावर बोलणे टाळले आहे. राज्यसभा निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी सेना आणि भाजपाने आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (palghar rajaya sabha election update Rajan Vichare meet bva chief hitendra thakur)
या राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदारांना जास्त महत्व प्राप्त झाले असून, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांची मते वळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे.
काल भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी हितेंद्र ठाकूर यांची विरार मध्ये येऊन भेट घेतल्यानंतर, आज शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, आणि खासदार राजन विचारे या दोघांच्या शिष्टमंडळाने विरारमध्ये येऊन हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन शिवसेनेच्या उमेदवारास मत देण्याची विनंती केली असल्याचे बोलले जात आहे.
हितेंद्र ठाकूर आणि शिवसेना शिष्ठमंडळात तब्बल 4 तास बंद दाराआड चर्चा झाली असून, सव्वा चार वाजता आलेले शिष्ठमंडळ हे रात्री 8 वाजता निघाले आहे. या 4 तासाच्या चर्चेत शिवसेना नेते संजय राऊत आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत ही फोनवरून चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हितेंद्र ठाकूर यांच्या बविआच्या 3 आमदारांचे मत मागण्यासाठी आलेल्या शिवसेना शिष्टमंडळाने बंद दाराआड 4 तास चर्चा केली. मात्र, राज्यसभा निवडणुकीवर आम्ही काही वेळचं चर्चा केली आणि नंतर आम्ही फक्त कौटुंबिक चर्चा केली असल्याचे सर्वांनीच सांगितले.