अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. परीक्षा घोटाळ्यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत विरोधक आंदोलन करत आहेत.
पेपर फुटीवरून विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. तलाठी भारतीची एसआयटी चौकशी झालीच पाहिजे, सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत करा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. पेपरफुटीप्रकरणी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.