आक्षेपार्ह विधान; अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंशिवाय समस्त महिलांची मागितली माफी

आक्षेपार्ह विधान; अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंशिवाय समस्त महिलांची मागितली माफी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या खोक्यांच्या आरोपांवर बोलताना शिंदे गटाचे आमदार व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीचा उल्लेख केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे.
Published on

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या खोक्यांच्या आरोपांवर बोलताना शिंदे गटाचे आमदार व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीचा उल्लेख केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. राजकीय वर्तुळातून अब्दुल सत्तारांवर टीका करण्यात येत आहे. यानंतर सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला आहे. पण, मी वक्तव्यावर ठाम असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे.

आक्षेपार्ह विधान; अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंशिवाय समस्त महिलांची मागितली माफी
अब्दुल सत्तारांची जीभ घसरली; सुप्रिया सुळेंना दिली शिवी

अब्दुल सत्तार म्हणाले की, माझ्या वक्तव्याने कोणतीही खळबळ उडालेली नाही. मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. जे आम्हाला खोक्यांबद्दल बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या डोक्यामध्ये काही परिणाम असेल. आणि हे भि***ट लोकच अशा पध्दतीने बोलतात. मग तो कोणीही असो मग. कोणाही आम्हाला असे बोलले तर त्यांना उत्तर देण्यास मी सक्षम आहे. मी कोणा व्यक्तीला नव्हेतर सर्वांसाठी बोललो असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मी कोणताही महिलांबद्दल अपशब्द बोललो नाही. सुप्रिया सुळेंबद्दल तसेच कोणत्याही महिलांचा मन दुखावेल असा कोणताही शब्द बोललो नाही. आणि जर त्यांच्या महिलांना वाटत असेल मन दुखली तर मी खेद व्यक्त करतो, असेही सत्तारांनी म्हंटले आहे.

मी जे बोललो ते खोक्यांबद्दल होते. महिलांबद्दल एक शब्दही मी बोललो नाही. याच्या पुढेही बोलणार नाही. मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्याबद्दल मी जे बोललो ती आमच्याकडची ग्रामीण भाषा आहे. बाकीच्या ज्या महिलांची मने दुखावली असतील तर सॉरी, असेही त्यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, याबाबत विचारले असता अब्दुल सत्तार म्हणाले, इतकी भि***' झाली असे तर तिलाही देऊ, असे उत्तर त्यांनी दिले आहे.

आक्षेपार्ह विधान; अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंशिवाय समस्त महिलांची मागितली माफी
सत्तारांनी सुळेंवर केलेल्या वादग्रस्त विधानावर पंकजा मुंडेंनी शिंदे गटाला सुनावले

दरम्यान, याआधीही अब्दुल सत्तार अनेकदा वादग्रस्त वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव खतगावकर यांना शिवीगाळ केल्याची माहिती होती. तर, जिल्हाधिकाऱ्यांनाही आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाले होते. तर, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हेही अनेकदा वादात सापडले आहेत. केवळ तीन महिनेच झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला त्यांचे मंत्री अडचणीत आणत असल्याने मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com