भारत जोडो यात्रेत नितीन राऊतांना धक्काबुक्की,  गंभीर दुखापत

भारत जोडो यात्रेत नितीन राऊतांना धक्काबुक्की, गंभीर दुखापत

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु आहे. यामध्ये कॉंग्रेस नेते व राज्याचे माजी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊतही सहभागी झाले होते.
Published on

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसादही मिळताना दिसत आहे. अन्य राज्यातील बडे नेतेही या यात्रेत सहभागी होत आहेत. यामध्ये कॉंग्रेस नेते व राज्याचे माजी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊतही सहभागी झाले होते. परंतु, गर्दीत झालेल्या धक्काबुक्कीमुळे नितीन राऊतांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भारत जोडो यात्रेत नितीन राऊतांना धक्काबुक्की,  गंभीर दुखापत
विरोधक रडीचा डाव खेळताहेत; अंबादास दानवेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तेलंगणा येथे पोहोचली असून हैदराबाद येथे सुरू आहे. या यात्रेत नितीन राऊत सहभागी झाले. परंतु, अफाट गर्दीत झालेल्या धावपळीत ते पडले. यात त्यांच्या कपाळाला जखम झाली असून उजव्या डोळ्याला, हाताला आणि पायालाही मुका मार लागला आहे. नितीन राऊत यांना कार्यकर्त्यांनी तातडीने जवळील हैदराबाद येथील वासवी रुग्णालयात दाखल झाले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, 70 वर्षीय राऊत यांच्यावर 2020 मध्ये अ‍ॅन्जियोप्लास्टी झाली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

भारत जोडो यात्रेत नितीन राऊतांना धक्काबुक्की,  गंभीर दुखापत
राज्यपालांना सांगून शिंदे-फडणवीसांना गुजरातमध्ये पाठविणार : नाना पटोले

दरम्यान, कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होत आहे. नवा मोंढा येथे सभा होणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 8 नोव्हेंबरला शरद पवार नांदेडमध्ये मुक्कामी येणार आहेत. 9 नोव्हेंबर रोजी नायगाव येथे ते पदयात्रेत सहभागी होतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह वकील, डाॅक्टर तसेच समाजसेविका मेधा पाटकर देखील यात्रेत सहभागी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com