मंत्रिपदासाठी अनेकजण सूट शिवून बसले होते, आता त्या सुटाचे काय करायचे? गडकरींची टोलेबाजी

मंत्रिपदासाठी अनेकजण सूट शिवून बसले होते, आता त्या सुटाचे काय करायचे? गडकरींची टोलेबाजी

सडेतोड आणि थेट वक्तव्यांसाठी प्रसिद्ध केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे.
Published on

कल्पना नळसकर | नागपूर : सडेतोड आणि थेट वक्तव्यांसाठी प्रसिद्ध केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी मार्मिक शब्दात टोले हाणले आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त नागपुरात विद्यापीठ शिक्षण मंचाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्रिपदासाठी अनेकजण सूट शिवून बसले होते, आता त्या सुटाचे काय करायचे? गडकरींची टोलेबाजी
पुन्हा मोठा राजकीय भूकंप, संजय शिरसाटाचं सूचक विधान

काय म्हणाले नितीन गडकरी?

जे नगरसेवक आहेत ते याकरिता दुःखी आहे की ते आमदार झाले नाही, आमदार याकरिता दुखी आहेत की ते मंत्री झाले नाहीत, मंत्री यासाठी दुखी आहेत की मला चांगलं खातं मिळालं नाही आणि आता जे होणार होते ते याकरिता दुखी आहेत की आपला चान्स येतो की नाही, एवढी गर्दी झाली आहे. पहिले सूट- बूट शिवून तयार होते, केव्हा येते आणि केव्हा जाते, आता त्या सुटाच काय करायचं हा प्रश्न आहे.

गर्दी झाली, मी रामदास आंबटकर (भाजपा विधान परिषद आमदार) यांना म्हटलं की या हॉलची कॅपॅसिटी 2200 आहे किती आले तरी बसू शकतात. पण मंत्रिमंडळाची नाही वाढवता येतं. त्यामुळे आपला देश आणि समाज हा दुखी आत्म्याचा महासागर आहे, असं म्हणत नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक टोलेबाजी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com