Nitin Gadkari : सगळे संधीसाधू आहेत, कोण कुठे जाईल सांगता येत नाही

Nitin Gadkari : सगळे संधीसाधू आहेत, कोण कुठे जाईल सांगता येत नाही

'सध्या राजकारणात तत्वनिष्ठता राहिलेली नाही.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

'सध्या राजकारणात तत्वनिष्ठता राहिलेली नाही. हल्ली कुठली व्यक्ती, कधी, कुठल्या पक्षात जाईल याची काही शाश्वतीच नाही. एखाद्या राजकीय विचाराला घट्ट धरून आयुष्य व्यतित करणे हे दुर्मीळ होत चालले आहे. सध्या सुरू असलेल्या गोंधळाला सामान्य जनता कंटाळली असून, यामुळे जनतेचा लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास उडेल.

एखाद्याचे विचार पटत नसतील तरीही त्याचा आदर करणे, हा स्वभाव राहिला नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं 'हल्ली विरोधी पक्षाशी संवाद होत नाही, त्यांचेही वर्तन साजेसे राहिलेले नाही. हे असेच सुरू राहिले तर लोकशाही व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल', अशी भीतीही नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

'सध्या कोण उजव्या विचारसरणीचे, कोण डाव्या विचारसरणीचे हे कळतच नाही इतक्या प्रमाणात पक्ष बदलले जातात. सध्या सर्वच क्षेत्रांत गुणात्मकता कमी झाली आहे. राजकारणही त्याला अपवाद राहिलेले नाही. आपण कसे वागतो याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे. विरोधी पक्षांनी स्वतःच्या मर्यादा समजून घ्यायला हव्यात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com