नारायण राणेंना शिवसेनेत घेतलं तर मी मुलाबरोबर...; नितेश राणेंचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

नारायण राणेंना शिवसेनेत घेतलं तर मी मुलाबरोबर...; नितेश राणेंचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

राज ठाकरेंच्या 'त्या' खुलाशावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया
Published on

मुंबई : नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्या मेळाव्यात केला आहे. यावर आज भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांना शिवसेना सोडण्यासाठी कसे प्रवृत केले याबाबत केलेले भाष्य वास्तव आहे. उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती कसा हे राज्याला बघू द्या. खरी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली असल्याची टीका नितेश राणे यांनी केले आहे.

नारायण राणेंना शिवसेनेत घेतलं तर मी मुलाबरोबर...; नितेश राणेंचा उध्दव ठाकरेंवर निशाणा
Rahul Gandhi : राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा, जामीनही मंजूर

नारायण राणे यांना शिवसेना सोडण्यासाठी कसे प्रवृत केले याबाबत केलेले भाष्य वास्तव आहे. मागे बोलणारे उद्धव ठाकरेच होते. नारायण राणे यांना पक्षात घेतलं तर मी माझ्या मुलाबरोबर घर सोडून जाईल, असे उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना सोडणं सोपं नव्हतं. पित्याला नाईलाजवास्तव भूमिका घ्यावी लागते. उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती कसा? राज्याला बघू द्या. जे वडिलांना धमकी देऊ शकतो. खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली, असे नितेश राणे यांनी म्हंटले आहे.

तर देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे आज एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, एकच गेट आहे त्यामुळे एकत्र आले. उद्धव ठाकरे आजारी माणूस आहे. त्यांना देवेंद्र यांनी साथ दिली असेल त्यात काय वेगळं, असा टोलाही त्यांनी लगावला.

लव्ह जिहाद, लँड जिहाद देखील आहे. त्यांचे उत्तम उदाहरणं माहिम, मुंबईच्या प्रत्येक वार्डमध्ये लँड जिहाद दिसेल. ग्रीन झोन लँडवर चार फ्लोरचा मदरसाचे बांधकाम सुरु आहे. चेंबूरमध्येही पाहायला मिळत आहे, असेही नितेश राणेंनी म्हंटले आहे.

दरम्यान, गुढीपाडव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थावर सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी नारायण राणे यांनी पक्ष का सोडला याचाही खुलासा केला. नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती. मी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मी नारायण राणेंशी बोललो, बाळासाहेबांची भेट घडवून आणायचा प्रयत्न केला. पण बाळासाहेब आणि राणेंची भेट जी घडवून आणायचा मी प्रयत्न केला पण ती भेट ती कोणीतरी घडू दिली नाही, असे राज ठाकरेंनी सांगितले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com