'राऊत सटकलंलं, आम्ही त्याला 10 मिनिटात पकडू व त्याची नशा बंदी करू'
मुंबई : विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं धक्कादायक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावरुन आज अधिवेशनात एकच गदारोळ झाला असून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले आहेत. संजय राऊतांवर हक्कभंगाचा आणण्याची जोरदार मागणी सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आली आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांनी पोलिसांचे संरक्षण काढून फिरावे. मग कोठे कोठे झेंडुबाम लावावे लागते ते कळेल. हा संजय राऊत शरद पवार, बाळासाहेब यांचा झाला नाही. त्यांना सभागृहाने शिक्षा करावी व नंतर आमच्याकडे द्यावा, आम्ही मिरवणूक काढू, असे टीकास्त्र नितेश राणे यांनी राऊतांवर सोडले आहे.
संजय राऊत यांचा वरचा कम्पर्टमेन्ट सटकलं असल्याचे जवळचे लोक सांगत आहेत. अशा सटकलेल्या माणसाला समाजात फिरता कामा नये. आम्ही त्याला 10 मिनिटात पकडू. त्याची नशा बंदी करू, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर टीका केली आहे.
तर, रोज सकाळी जे ऐकावे लागते त्याची गरज आहे का? त्याचा आणि शिवसेनेचा काय संबंध?सामनामध्ये असायच्या आधी शिवसेनेविरोधात लिहायचा. हिंदुहृदयसम्राट यांच्या पत्नी सोबत पटत नाही, असेही त्याने लिहिले. राऊतांचे पोलीस संरक्षण १० मिनिटे काढा. उद्या सकाळी फिरणार नाही, अशी थेट धमकीही राणेंनी राऊतांना सभागृहात दिली.
दरम्यान, ही गंभीर बाब असून सार्वभौम सभागृहाच्या घटनात्मक कार्यावर प्रतिकात्मक परिणाम करणारी आहे. राज्याच्या जनतेचाही अपमान करणारे वक्तव्य असून याची सखोल चौकशीची गरज आहे. दोन दिवसांत चौकशी करुन बुधवारी ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे विधाससभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.