नितेश राणे यांनी फोटो ट्विट करत साधला अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा
नितेश राणे यांनी अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे. नितेश राणे यांनी फोटो ट्विट करत अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, 'गॅंग भोजन!' हे आहेत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्राचा भोंगा संज्या. दोघेही बेलवर बाहेर आहेत. नागपुरात जेवणाचा आनंद घेत आहेत. हरकत नाही. पण बेलवरचे हे दोन्ही आरोपी कुणासोबत जेवतात तेही पहा. गौतम भटकर सोबत आहे.
हा भटकर कुख्यात संतोष आंबेकर टोळीचा म्होरक्या. या भटकरवर मोक्का सुद्धा लागला, बलात्कार केला आणि त्याच तरुणीसोबत लग्न करून सुटला. खंडणीचे तर कित्येक गुन्हे त्याच्यावर आहेत. आता अशा गुन्हेगारांसोबत रहाल तर जेलमध्ये जावेच लागणार. मग भाषणात कशाला सांगता नागपूरच्या माणसामुळे आम्हाला जेलमध्ये जावे लागले! जैसी करनी वैसी भरनी!