उद्धव ठाकरे कोणत्याही अटी-शर्थीशिवाय भाजपसोबत येण्यास तयार; कोणी केला दावा?

उद्धव ठाकरे कोणत्याही अटी-शर्थीशिवाय भाजपसोबत येण्यास तयार; कोणी केला दावा?

राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडत आहेत. नितेश राणे यांच्या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Published on

मुंबई : राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडत आहेत. कुठल्याही अटी-शर्थीशिवाय उद्धव ठाकरे भाजपसोबत येण्यास तयार असल्याचा मोठा दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. या संदर्भातील बैठका कोणत्या हॉटेलमध्ये झाल्या आहेत? याचीही माहिती आपल्याला असल्याचे नितेश राणे यांनी म्हंटले आहे. नितेश राणे यांच्या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरे कोणत्याही अटी-शर्थीशिवाय भाजपसोबत येण्यास तयार; कोणी केला दावा?
अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार द्यावा; केसीआर यांची मोदी सरकारकडे मागणी

मणिपूरमध्ये जाणारे विरोधक पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये का जात नाहीत? पश्चिम बंगालमध्ये आज पाकिस्तानप्रमाणे अराजकता झाली आहे. हा फक्त मोदी द्वेष आहे आहे, त्यामुळे विरोधक फक्त मणिपूरच्या मुद्द्यावर बोलत आहेत, असा पलटवार नितेश राणे यांनी विरोधकांवर केला आहे.

संबंधित खात्याचे मंत्री उत्तर द्यायला तयार असतानाही विरोधक फक्त राजकारण करत आहेत. पंतप्रधानांची मागणी करताना विरोधकांनीही यापुढे काँग्रेसमध्ये काहीही झालं तर फक्त सोनिया गांधी यांनीच उत्तर द्यावं ,अशी प्रथा पाडायची आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मणिपूर घटनेवर सरकार चर्चेला तयार आहे. मात्र, विरोधकांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी संसदेत उभे राहून चर्चा करावी. मणिपूर मुद्द्यावर चर्चा करताना विरोधकांनी राजस्थान आणि पश्चिम बंगाल घटनांवरही चर्चा करावी, असेही त्यांनी म्हंटले आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप केलेले सर्व नेते आज मोदींसोबत असतील, अशी टीका संजयच राऊतांनी मोदी-पवारांवर केली होती. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, राऊत यांना आता सत्ता गेल्यामुळे सामनातील पगार बंद होण्याची भीती आहे. याआधी सामना आणि सिल्वर अशा दोन ठिकाणाहून त्यांना पगार येत होते. आता सिल्वर ओकचा पगार बंद झाला आहे. त्यामुळे ते शरद पवार आणि राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. याआधी सत्तेत असताना त्यांना राष्ट्रवादी कशी चालली? तेव्हा त्यांना त्यांचे लाड करावेसे वाटले.

भारतीय जनता पक्षाबरोबर मैत्री करण्याचे प्रस्ताव तुम्ही का पाठवत आहात? आज कुठल्याही अटी-शर्थीशिवाय तुम्ही भाजपसोबत घ्या अशी बोलणी उद्धव ठाकरे व त्यांची माणसं करत आहेत. आणि ही चर्चा कुठल्या हॉटेलमध्ये बसून त्यांनी केली त्याची माहिती माझ्याकडे आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com