फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे लव्ह-हेटचं नातं; कोण म्हणाले असं?

फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे लव्ह-हेटचं नातं; कोण म्हणाले असं?

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Published on

पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे लव्ह आणि हेटचं नातं असल्याचे नीलम गोऱ्हेंनी म्हंटले आहे. दोघांच्या बोलण्यात द्वेष आणि त्वेष दिसतो. मात्र, देवेंद्र फडणवीसांकडून एवढे अपशब्द ऐकले नाहीत. परंतु, उद्धव ठाकरेंचा ठाकरी बाणा आहे त्यांनी ते कमी करावं. मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत, असा सल्लादेखील गोऱ्हेंनी दिला आहे.

फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचे लव्ह-हेटचं नातं; कोण म्हणाले असं?
अनेकांना पोटदुखीचा आजार; शिंदेंचा उध्दव ठाकरेंना टोला, लवकरच डॉक्टर आपल्या दारी करू

राज्य सरकारकडून होत असलेल्या कंत्राटी भरतीवर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, पेन्शन, आर्थिक बोजा, बदल्या काही अधिकारी एक ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी जायला तयार नसतात. अशावेळी कंत्राटी कामगार उपयोगी येतात. कंत्राटी सेवा अनेक वर्षांपासून सुरू आहे. कंत्राटी कामगारांच महामंडळ होणं आवश्यक आहे त्यांच्यासाठी नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे.

दरम्यान, ठाकरेंच्या बाजूने एक पिटिशन देण्यात आलं होतं. निरंजन डावखरेंनी निर्णय दिला आहे. विधानपरिषदेतला प्रतोद पदाचा निर्णय अजून झाला नाही. शिंदे गटाकडून विप्लव बाजोरिया आणि ठाकरे गटाकडून विलास पोतनीस यांच नावं आहे. मात्र त्याबाबतीत अजून निर्णय झाला नाही. गटनेता म्हणून कोणाला नेमावं याविषयी अजित दादांकडून पत्र आलं आहे. विधासभेत असं झालं म्हणून विधानपरिषदेत होईल असं नाही. मात्र आधी विधानसभा काय निर्णय देते पाहावं लागेल, असेही नीलम गोऱ्हेंनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com