नीलम गोऱ्हेंचा ठाकरे गटाला रामराम! शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

नीलम गोऱ्हेंचा ठाकरे गटाला रामराम! शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोऱ्हेंनी प्रवेश केला आहे.
Published on

मुंबई : पावसाळी अधिवेशनापुर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मनिषा कायंदे यांच्या पाठोपाठ विधान परीषद उपसभापती आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोऱ्हेंनी प्रवेश केला आहे. तर,

देशाच्या विकासासाठी पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. उपसभापतीपद सांभाळत पक्षाची भूमिका मांडत राहणार, अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तर, नीलम ताई तुम्हाला आता कोणतीही अडचण होणार नाही. पुढे आपल्याला खूप काम करायचं आहे. कोणीही तुमचा आवाज दाबणार नाही. आपण खूप ताकदीने काम करणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

नीलम गोऱ्हे यांनी 1987 पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांनी काही काळ सामाजिक चळवळीत काम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

नीलम गोऱ्हे या सध्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. विधानपरिषदेत त्यांनी शिवसेनेच्या प्रतोद म्हणून काम पाहिलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेतेपदही त्यांच्याकडे आहे. तसेच निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या स्टार प्रचारक म्हणूनही त्या सक्रिय होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com