राज ठाकरेंचा पाठोपाठ शरद पवारांची अंधेरी पूर्व पोटनिवडणुक बिनविरोध करण्याची मागणी
राज्यात अभूतपूर्व राजकीय गोंधळ घडताना सध्या दिसत आहे. अशातच अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून सध्या मोठा गदारोळ सुरु आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ही अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध घ्यावी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी सर्वासर्वे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे मत मांडले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर बोलताना पवार म्हणाले की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहे. मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकी झाली. मी राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून तेंव्हा भूमिका घेतली होती की, मुंडेच्या परिवारातील कोणीही उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका मी त्यावेळी घेतली होती. अशी आठवण त्यांनी विरोधकांना करून दिली आहे.
अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करू नका
रमेश लटके यांचा योगदान पाहता. अंधेरी पूर्व पोटनिवडणुक बिनविरोध करणे योग्य राहील, आणि राज्याला एक चांगला संदेश जाईल. महाराष्ट्रत योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे, असे मत त्यांनी यावेळी मांडले. भाजप आणि इतर उमेदवारांना आवाहन केलं आहे की, अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करू नका. असे विधान त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले.
खेळात राजकरण करता येत नाही
पुढे एमसीए पोटनिवडणुकीवर बोलताना पवार म्हणाले की , खेळामध्ये आम्ही राजकारण आणत नाही. मी बीसीसीआय एमसीएचा अध्यक्ष होतो. तेव्हा नरेंद्र मोदी नावाच्या गृहस्थांनी मला पाठींबा दिला, ते गुजरात चे मुख्यमंत्री होते. आता सुद्धा एमसीएम बीसीसीआय निवडणुकीत आताच्या संघटना सुद्धा चांगलं काम करत आहेत, त्यात राजकारण येत नाही. खेळात राजकरण करता येत नाही असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.