मोठी बातमी, शरद पवार यांच्या बाजूनं फक्त 11 आमदार?
राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
आज शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठका पार पडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आज मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. अजित पवार यांच्या गटाचा मेळावा बॅण्ड्रा एमआयटी येथे होणार आहे तर शरद पवार गटाचा मेळाला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार आहे.
याच्या आधीच आता अशी माहिती मिळत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत एकूण 54 आमदार आहेत. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेच्या 42 आणि विधान परिषेदच्या 2 आमदारांच समर्थन आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या गटाकडे फक्त 11 आमदारांच समर्थन असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अजित पवार गटाने नेमलेले प्रतोद अनिल पाटील यांचा व्हीप या आमदारांना लागू होतो.