'वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणाऱ्यांनी विचार करुन बोलावे' कोल्हेंचे राणेंना जोरदार प्रत्युत्तर
राज्यात सध्या एकपाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये देखील चांगलेच शाब्दिक युद्ध सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच काल वर्ध्यात एका कार्यक्रमात बोलत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होता. त्यावरच आता अमोल कोल्हे यांनी नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय दिले कोल्हेंनी नितेश राणेंना प्रत्युत्तर?
नितेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कोल्हे म्हणाले की, जे वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणाऱ्यांनी विचार करुन बोलावे. कारण बोलताना असताना त्यांचे संस्कार प्रकट होतात. महाराष्ट्रातील राजकारणाला सुसंस्कृतपणाचा आदर्श आहे. माईकवरच बोलायचे असेल तर मला ही बोलता येतं. पण इतिहास मांडण्यासाठी मी राजकारण आणत नाही. तसेच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आलेल्या लोकांनी जास्त बोलू नये. अशा शब्दात कोल्हेंनी राणेंना इशारा दिला.
काय केली होती नितेश राणेंनी टीका?
लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत अमोल कोल्हेला आपटून टाकू. कोल्हे कुठेही भेटू दे, त्याला दाखवतोच असं विधान केलं होतं. तसेच तो कुठला अमोल कोल्हे नावाचा ॲक्टर. पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. तो काही फुकट करत नाही. नावासाठी खासदार झाला आहे. दाढी काढली तर कोणी ओळखणार पण नाही. तो सिरीयल पुरताच आहे. आणि अजितदादांना कोल्हे लिहून देतो आणि ते वाचून दाखवतात अशी बोचरी टीका राणे यांनी केली होती.