'फाशी द्या,अथवा गोळ्या घाला...' मुश्रीफांवरील कारवाईवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकली. मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून दीड महिन्यात तीन वेळा छापेमारी करण्यात आली. त्यामुळे या छापेमारीनंतर मुश्रीफ यांचे कार्यकर्ते भाजपा आणि किरीट सोमय्यांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच छापेमारीवर राजकीय वर्तुळातुन प्रतिक्रिया येत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून करण्यात आली त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, राज्य सरकारमधील काही लोक केंद्राला सांगून यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिलीय. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ, सदानंद कदमांवरील ईडी कारवाईसह तसेच वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत.अशा परिस्थितीमध्ये मुश्रीफ साहेबांच्या पत्नीला जे वाटले ते योग्यच आहे. काही सापडत नसेल तर दहा दहा वेळा तुम्ही येणार त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेले भावना अतिशय दुःखद आहे. त्यामुळे फाशी द्या अथवा गोळ्या घाला मात्र हा राजकीय थांबवा. हायकोर्ट आणि त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पुढे त्यांनी सदानंद कदम यांच्या अटकेवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप ही निवडणूक होत होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलता बोलता असे वक्तव्य केले होते की, जर तुम्ही भाजपच्या विरोधात बोलला किंवा भाजीपाला सहकार्य केलं नाही तर आम्ही तुमच्यावर ईडीची कारवाई करू. यावरूनच तुम्ही समजून घ्या. ईडीचा आणि इतर केंद्रीय तपसंत्रणांचा गैरवापर कसा करू याचा घमंड त्यांना आहे. अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.