दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या नावावरून रोहित पवारांची भाजप- शिंदे गटावर टीका
राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने जुंपलेली दिसते. या सर्वादरम्यान, शिंदे- फडणवीस सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. मात्र, या अधिवेशनात प्रचंड गदारोळ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी दादा कोंडके यांच्या चित्रपटाच्या यावरून राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. सोबतच शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
काय केले रोहित पवार यांनी ट्विट?
आजच्या राजकीय परिस्थितीबाबत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या भाषेत बोलायचं झालं तर. 'मला घेऊन चला' म्हणत भाजपसोबत गेलेल्या शिंदे गटावर टीका केली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरी त्यांनी म्हणून 'पळवा पळवी' करत 'तुमचं आमचं जमलं' म्हणत 'सोंगाड्यां'चं राज्य आलं खरं! अशी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. पण सध्या 'खोल दे मेरी जुबान' असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या सामान्य माणसावर आलीय. अरे. राज्याच्या भल्यासाठी थोडी तरी 'आगे की सोच' असू द्या.. नाहीतर ज्यांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिलं तेच उद्या म्हणतील 'वाजवू का?' असे रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले आहे.